VIDEO: जन्मत:च दृष्टी गमावलेल्या चिमुकलीची डोळस 'भूमिका', लहान भावाच्या सायकलवर फिरून कोरोना लसीबाबत जनजागृती - यवतमाळ कोरोना लस जनजागृती
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग वाढत आहे. दररोज रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. प्रत्येक नागरिकाने कोविड लस घ्यावी असा प्रशासनाचा आग्रह आहे. तरीदेखील नागरिक त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. मात्र, जन्मत:च दृष्टी गमावलेल्या इवल्याशा चिमुकलीने डोळस भूमिका घेतली आहे. लहान भावाच्या सायकलवर फिरून कोरोना जनजागृती करीत आहे. भूमिका सुजित राय असे कोरोना लसीबाबत जनजागृती करणाऱ्या मुलीचे नाव आहे. लहान भावासोबत सायकलवर यवतमाळ शहरात फिरून भूमिका नागरिकांना लस घेण्यासह कोरोना त्रिसूत्रीचे पालन करण्याचे आवाहन करताना दिसत आहे. भूमिकाच्या या डोळस जनजागृतीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.