लॉकडाऊन निर्णयाविरोधात औरंगाबादमधील व्यापारी आंदोलनाच्या तयारीत - औरंगाबाद मिनी लॉकडाऊन
औरंगाबाद - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात "ब्रेक द चेन"अंतर्गत नवीन नियमावली लागू करण्यात आली. मात्र नवीन नियम म्हणजे लॉकडाऊनच असल्याचा आरोप केला जात आहे. सर्व व्यापार बंद होणार नाही, असे आश्वासन दिल्यानंतर अचानक बंद कसा लावण्यात आला असा प्रश्न उपस्थित करत, नियम न बदलल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा औरंगाबाद व्यापारी संघटनांनी दिला आहे.