नवरात्र 2021 : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात फुलांची आकर्षक सजावट; पाहा व्हिडीओ - Kolhapur latest news
कोल्हापूर - दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या काळात अंबाबाईला विविध रूपात पूजा बांधण्यात येत असते. ही आकर्षक पूजा पाहण्यासाठी संपूर्ण राज्यासह देशभरातील भाविक करवीर नगरीत येत असतात. मात्र, यंदा नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई बरोबरच फुला-फळांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे. उद्यापासून सुरू होत असलेल्या या शारदीय नवरात्रोत्सवाची सर्वांना आतुरता लागली असून कधी एकदा अंबाबाईचे दर्शन घेईल अशी सर्वांची भावना आहे.
Last Updated : Oct 7, 2021, 8:03 AM IST