जिल्हाधिकारी कार्यालयात अमडापूर प्रकल्पग्रस्ताचा आत्मदहनाचा प्रयत्न - अमडापूर प्रकल्पग्रस्त यवतमाळ
यवतमाळ - मागील 18 वर्षांपासून उमरखेड तालुक्यातील कुरळी येथील ग्रामस्थ अमडापूर प्रकल्पच्या पुनर्वसनासाठी झगडत आहेत. नऊ ऑगस्टपासून येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू केले. मात्र, शासनाने याची कुठलीच दखल न घेतल्याने आज (गुरूवार) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त कैलास डुकरे यांनी अंगावरती रॉकेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसानी वेळीच सतर्कता दाखवल्याने होणारा अनर्थ टळला. दरम्यान, उपोषणकर्त्या एक महिलेला रात्री दोन वाजता शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. याची दखल शासनाने न घेतल्यास 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिनी) ला सर्व ग्रामस्थ आत्मदहन करणार असल्याचा इशारा कुरळीवासीयांनी दिला आहे.