VIDEO: सचिन वाझेंनी मनसुख हिरेन हत्येप्रकरणी दिलेला जबाब खोटा, एटीएस प्रमुखांची माहिती - जयजीत सिंग पत्रकार परिषद
मुंबई - एटीएसने आज मनसुख हिरेन हत्याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एटीएस प्रमुख जयजीग सिंग यांनी सांगितले की, मनसुख हिरेन प्रकरणातील संशयित आरोप सचिन वाझे यांचा जबाब नोंदविण्यात आला. चौकशीदरम्यान त्यांनी सर्व आरोप फेटाळले. तसेच अंबानींच्या घरासमोर आढळलेली स्कॉर्पिओ गाडी कधीही आपल्या ताब्यात नसल्याचे सांगितले. तसेच मृत हिरेन यांच्यासोबत कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. सदर गुन्ह्यात कोणताही सहभाग नसल्याचे सांगितले. परंतू दहशतवाद विरोधी पथकाच्या तपास अधिकाऱ्यांनी सचिन वाझेंचा जबाब खोटा असल्याचे पुरावे प्राप्त केले असून त्यांचा गुन्ह्यामध्ये नक्की काय सहभाग आहे, याबाबत चौकशी सुरू आहे, अशी माहिती जयजीत सिंग यांनी दिली.