चौकशी होण्यापूर्वीच राजीनामा मंजूर करु नये, संजय राठोड यांच्या समर्थकांची मागणी - संजय राठोड यांचे समर्थक बातमी
यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणांमध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत आहेत. या प्रकरणाला तब्बल वीस दिवस झाले. रविवारी वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला. यानंतर जिल्ह्यातील शिवसेना समर्थकांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय राजीनामा मंजूर करुन नये, अशी मागणी केली आहे.