विलीनीकरणावेळी आपली संपत्ती भारत सरकारला देणारे अक्कलकोट संस्थान - अक्कलकोट तालुका बातमी
सोलापूर - स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राजेशाही असलेली भारतातील 500 संस्थाने विलीनीकरण करून घेण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी सरकारच्या विलीनीकरणाच्या आदेशाला जुनागढ, काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांनी विरोध केला. पण, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ही संस्थाने खालसा करून भारतात विलीन करून घेतली. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट संस्थान 11 ऑगस्ट, 1947 रोजी भारतात स्वतःहून सामिल झाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट संस्थानाची स्थापना 1707 साली झाली होती. फत्तेसिंह राजे भोसले (पाहिले) यांनी याची स्थापना केली होती. आजही येथील जुना राजवाडा आणि नवीन राजवाडा याची साक्ष देत मोठ्या दिमाखात उभे आहेत. दत्तक पुत्र मालोजीराजे हे संस्थानचे सध्याचे वंशज असून आपल राजवंश टिकवून आहेत.