जालन्यात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक बेमुदत संपावर - Asha worker demands Jalna
जालना - ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महिला कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेल्या आहेत. या संदर्भात आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले आहे. आशा गटप्रवर्तकांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, 45 व्या श्रम परिषदेच्या शिफारशीनुसार आशा गटप्रवर्तकांना किमान वेतन 22 हजार रुपये लागू करण्यात यावे आणि अन्य मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. यावेळी जिल्ह्यातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
Last Updated : Jun 15, 2021, 10:54 PM IST