सरकारहो... आमचंही ऐका! कोरोनामुळे हताश झालेल्या कलाकार-लोककलाकारांचा एल्गार - federation of artist association news
मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेले पाच महिने राज्यात लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात सर्वत्र सार्वजनिक कार्यक्रम, जत्रा-यात्रा, लग्न समारंभ रद्द करण्यात आले. त्यामुळे ऑर्केस्ट्रा, पथनाट्य व वादकांसह राज्यातील इतर कलाकारही आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले. या काळात काहींनी व्यवसाय सोडून मेहनत केली, काहींना अन्य व्यवसायात फारसे काही हाती न लागल्याने आत्महत्या केली. अनेक कलाकांरावर उपासमारीची वेळ आली. मात्र, आता लॉकडाऊन शिथिल झाले तरी, कलाकारांना हाताशी काम नाही. त्यामुळे, आमचे कार्यक्रम सुरू करा, रोजगार द्या, अशी मागणी या कलाकारांनी केली आहे. संयुक्त महाराष्ट्र घडवणाऱ्या या कलाकारांकडे प्रत्येकवेळी तुम्ही दुर्लक्ष करणे हे चुकीचे असल्याची भावना यावेळी अनेक कलाकारांनी व्यक्त केली.
Last Updated : Sep 16, 2020, 4:43 PM IST