Video : भारतीय जवानांचं हिमवृष्टीतील 'खुकुरी' नृत्य बघितलं का?; पाहा व्हिडिओ - आर्मी डान्स व्हिडिओ
सध्या कडाक्याच्या थंडीची लहर सर्वत्र पसरली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये शीतलहर कायम आहे. भारतीय सीमांवरील अनेक भागात उणे तापमान आहे. याही तापमानात आपले जवान देशाचे संरक्षण करित आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाड जिल्ह्यातील तंगधर सेक्टरच्या परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे. हिमवृष्टी होत आहे. अशा कठिण परिस्थितीतही आपल्या जवानांचा उत्साह कायम आहे. काही जवान खुकुरी नृत्यू सादर करत असल्याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्याकडून शेअर करण्यात आला आहे.