'त्या' लोकांची काळजी सरकार घेतंय, म्हणून 'या' प्राण्यांना आम्ही संभाळतोय - Caring pets of corona infected people
सांगली - कोरोनामुळे जगभरात न भूतो न भविष्यती अशी स्थिती निर्माण झाली आहे. कितीही वाद असला तरी, संकटाच्या वेळी धावून जाण्याची माणुसकी आतापर्यंत जिवंत होती. पण आता कोरोनाच्या भीतीने कितीही मनात आलं तरी, मदतीचे हात आखडता घेता जात असल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत सांगलीतील एका अवलियाने कोरोनाग्रस्तांच्या घरातील पाळीव प्राण्यांचा सांभाळ करण्याचा वसा घेतला आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर संबंधित कुटुंबातील पाळीव प्राण्यांचा सांभाळ कसा करायचा? हा प्रश्न या प्राणी मित्राने सोडवला आहे. गेल्या महिन्याभरात कोरोनाबधितांच्या घरातील 12 पाळीव प्राण्यांना आपल्या घरी आणून त्यांचे पालनपोषण करत आहे. प्राणीमित्र अशोक लकडे आणि त्यांची संपूर्ण टीम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती काळजी घेऊन हे काम करत आहे,