महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Mumbai Nirbhaya Case : सुरक्षिततेसाठी भीक कुठे मागायची? सर्वसामान्य महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया - Mumbai Sakinaka Rape case

By

Published : Sep 11, 2021, 3:33 PM IST

पुणे - मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला आहे. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उ़डाली आहे. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून, पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज पुणे, मुंबई या ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनेत वाढ झाली आहे. आज महिला सुरक्षित नसून सुरक्षिततेसाठी कुठे भीक मागायची? असा संतप्त सवाल सर्वसामान्य महिलांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details