Thane police action - आंध्र प्रदेशातील गुन्हेगारी टोळीला ठाणे पोलिसांनी घेतले ताब्यात - गुन्हेगार टोळीळा ठाण्यात अटक
ठाणे - नागरिकांवर नजर ठेवून त्यांना लुटणाऱ्या आंध्र प्रदेश राज्यातील चार जणांच्या टोळीला (criminal gang) कापूरबावडी (Thane Police) पोलिसांनी तुळजापूर येथून ताब्यात घेतले आहे. रवी जयराज गुंज्या, शिरीषकुमार संपतकुमार पिटला, मोजेस उर्फ नानी मॉरिस गोगुला, रघुवरण भास्कर आकुला अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. (A gang of thieves) या टोळीकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, 50 हजाराची रोकड, 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व इतर ऐवज असा एकूण 2 लाख 29 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.