इंदोरीकरांच्या कार्यक्रमाला अंनिसचा विरोध; कोल्हापुरात पुरोगामी संघटना एकवटल्या
कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठामध्ये माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शिव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच महोत्सवात इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. मात्र, संबंधित निवृत्ती इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील अंनिस आणि विविध संघटनांनी विरोध केला आहे.