आता नवनीत राणाला सोडणारच नाही - आनंद अडसूळ - Amravati breaking news
अमरावती - भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्या नवनीत राणा या पूर्णतः खोटरड्या आहेत. या अनुसूचित जातीसाठी राखीव आणाऱ्या अमरावती मतदार संघात आपण अनुसूचित जातीत मोडतो याचे खोटे प्रमाणपत्र सादर करणाऱ्या नवनीत राणा यांचा खोटारडेपणा उच्च न्यायालायत उघड झाला आहे. आता त्याचे संसदेत बसणेही घटनेचा अवमान असून नवनीत राणा यांना शिक्षा होईपर्यंत आम्ही सोडणार नाही, असा इशारा अमरावतीचे माजी खासदार आनंद अडसूळ यांनी दिला आहे. सलग 8 वर्षे लढा दिल्यावर 5 जूनला आनंद अडसूळ यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निर्णय आल्यावर त्यांनी आज (दि. 11 जून) अमरावतीत येऊन पत्रकार परिषद घेतली.