दिलीपकुमार यांचे बाळासाहेबांसोबत होते स्नेहबंध, हिंदी सिनेसृष्टीतील एक युग संपले - संजय राऊत - एकनाथ खडसे यांच्या जावयाला अटक
मुंबई - ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले. शिवसेनेच्यावतीने खासदार संजय राऊत यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, 'दिलीप कुमार बरेच दिवस आजारी होते. त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टीतील एक युग संपलं आहे. हिंदी सिनेसृष्टीतील खरे बादशहा दिलीपकुमार होते', अशा शब्दात शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिलीप कुमार यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. राजकुमार, देवानंद, दिलीपकुमार ही मंडळी नेहमी बाळासाहेबांकडे येत होती. त्यांच्यात चांगले ऋणानुबंध होते. अशा शब्दात संजय राऊत यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Last Updated : Jul 7, 2021, 2:00 PM IST