सिनेमागृह सुरू झाल्याने रसिकांत उत्साहाचे वातावरण - etv bharat live
यवतमाळ - कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने दिवाळीच्या तोंडावर सिनेमा गृह सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दीड वर्षांनंतर प्रत्यक्ष सिनेमागृहात चित्रपट बघता येणार असल्याने प्रेक्षकांत उत्साह आहे. तर, कामगारांना पुन्हा रोजगार मिळणार आहे. राज्यासह देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने सिनेमागृह बंद करण्यात आले होते. त्यामुळे कामगार वर्गावर उपासमारीची वेळ आली होती. काही सिनेमागृह मालकांनी कामगारांना अर्धा पगार दिला. मात्र, त्या पगारात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते. अखेर सिनेमागृह सुरू होणार असल्याने दिवाळीच्या सुटीत नवीन चित्रपट बघण्याचा आंनद लुटता येणार आहे. चित्रपटगृह मालकांनी कोविड नियम पाळून योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहे.