नाशिकमध्ये कोरोना योद्धांच्या रुपात विघ्नहर्ता भक्तांच्या भेटीला - नाशिक कोरोना अपडेट
गणेशमूर्ती कलाकार योगेश टिळे यांनी अतीशय कल्पकतेने बापाची मूर्ती साकारली आहे. या मुर्तीतून त्यांनी डॉक्टर आणि पोलिसांना सलामी दिली आहे. मुर्तीच्या एका बाजूला डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांचे रूप साकारले आहे. डॉक्टराच्या गणवेशासोबत हातात इंजेक्शन आणि गळ्यात स्टेथस्कोप तर पोलीस वर्दीत असलेल्या बाप्पाच्या हातात काठी दाखवण्यात आली आहे.