अमरावती शहरातील उच्चशिक्षित तरुणीची सापांशी मैत्री - snake friend kadambari chaudhari
साप हा शब्द जर कानावर पडला तर भिती वाटल्याशिवाय राहत नाही. जिथे साप पकडायला भलेभले घाबरतात तिथे मात्र एक तरुणी चक्क सहजपणे सापांना पकडून त्या सापांशी मैत्री करत आहे. आतापर्यंत फक्त पुरूष सर्पमित्र आपण ऐकिवात असू मात्र, इथे चक्क एक तरुणी नाग, मण्यार, फुरसे आणि घोणस असे विषारी आणि बिनविषारी दोन्ही प्रकरचे साप पकडते व त्यांना जंगलात सोडते.
Last Updated : Jan 22, 2020, 12:43 PM IST