Muslim Reservation : मुस्लिमांना धर्माप्रमाणे आरक्षण देणे म्हणजे घटना विरोधी - अनिल बोंडे - अनिल बोंडे मूस्लिम आरक्षण
अमरावती - एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी केली. यावर भाजपा नेते व माजी कृषी अनिल बोंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्माप्रमाणे आरक्षण देण्याचे कुठेही प्रयोजन भारतीय राज्य घटनेत नाही. त्यामुळे मुस्लिमांना धर्म म्हणून आरक्षण देणे, हे घटना विरोधी राहणार, असे अनिल बोंडे म्हणाले. तर असदुद्दीन ओवेसी यांनी आरक्षणापेक्षा मुस्लिमांमधील शिक्षण वाढावे व मुस्लिम मुख्य प्रवाहात यावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करावे, असा सल्ला बोंडे ओवेसींना दिला.