Amit Deshmukh On Congress : सरकारमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नाही, ही तर कार्यकर्त्यांची भावना - अमित देशमुख - काँग्रेस पक्ष डिजीटल सदस्य नोंदणी अभियान
औरंगाबाद - महाविकास आघाडी सरकारमध्ये न्याय मिळत नसल्याची कार्यकर्त्यांची भावना असल्याचे वक्तव्य वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख ( Amit Deshmukh on injustice to congress ) यांनी केले आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेस पक्षाच्या डिजीटल सदस्य नोंदणी अभियानात ( Congress member Digital campaign ) मंत्री देशमुख बोलत होते. त्यामुळे सरकारमध्ये आलबेल आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ( Amit Deshmkh on congress role in gov ) राज्य सरकारमध्ये काँग्रेसला न्याय मिळत नाही, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर पत्रकारांनी विचारणा केली असता मी जे वक्तव्य केले ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले. कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अधिक आक्रमक होऊ, असेही ( Amit Deshmukh on aggressive congress ) त्यांनी सांगितले.
Last Updated : Jan 25, 2022, 3:21 PM IST