कोरोनामुळे अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात भक्तांविना नवरात्रीची पूजा - शारदीय नवरात्रोत्सव २०२०
विदर्भाची कुलदैवत आणि अमरावतीची ग्रामदैवत असणाऱ्या अंबादेवी सुमारे 5 हजार वर्षांपासून अमरावतीत आहे. पूर्वी गावाबाहेर असणारे आणि आज शहराच्या मध्यभागी अंबामातेचे अतिप्राचीन मंदिर आहे. अमरावती शहराचे नाव अंबामातेच्या नावावरूनच पडले, असे मानले जाते. दरवर्षी नवरात्रीत येथे भाविकांची मोठी गर्दी असते. मात्र, कोरोनामुळे यावर्षी भाविकांना प्रवेश नसून दर्शनासाठी लाइव्हची व्यवस्था करण्यात आली आहे.