गणपती विसर्जन 2021 : गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाची तयारी पूर्ण; 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने घेतला आढावा - ganpati Immersion 2021
मुंबई - गणेशोत्सव हा मुंबईकरांसाठी सर्वात आवडीचा आणि उत्साहाचा सण. मात्र, मागील दोन वर्षांपासून कोरोनाचे विघ्न आले आणि गणेशोत्सवासह सर्वच सण-उत्सव हे घरातल्या घरात साजरे करण्याची वेळ मुंबईकरांसह महाराष्ट्रावर आली आहे. यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले होते. त्याला नागरिकांनीही योग्य प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. आज मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे मुंबईकर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी येत आहेत. 'गणपती बाप्पा मोरया...सारी विघ्ने घेऊन जा...पुढच्या वर्षी लवकर या' असे म्हणत भक्त गणपतीला निरोप देत आहेत. गिरगाव चौपाटी येथे विसर्जनाची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. याचा आढावा घेतला आहे 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी.