गणपती उत्सवावर राज्यात कोणतेही नवे निर्बंध नाहीत - राजेश टोपे - गणपती उत्सव कोरोना नियम
जालना - राज्यात आजपासून सुरू झालेल्या गणपती उत्सवावर राज्यात कोणत्याही प्रकारचे नवे निर्बंध नाहीत. मात्र, या दहा दिवसांच्या काळात कोविड अनुरूप असे जे नियम आहे, ते पाळावे लागणार आहेत. राज्यात केरळप्रमाणे कोरोनाची संख्या वाढू नये, याकरिता सर्व राजकीय सभा व सम्मेलन कार्यक्रमांवर मर्यादा घालण्यात येईल, या बाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
Last Updated : Sep 10, 2021, 3:26 PM IST