व्हिडिओ : बच्चु कडूंच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेनमेंट झोनमध्ये जाण्यास केली होती मनाई - बच्चु कडू अकोला न्युज
अकोला - गुरूवारी अकोल्याचे पालकमंत्री बच्चु कडू यांनी शहराचा अचानक पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी शहरातील कोरोना कंटेनमेंट झोनचे स्टिंग ऑपरेशन केले. कंटेनमेंट झोनमध्ये पोलीस नागरिकांना सर्रास सोडत असल्याच्या तक्रारी त्यांच्याकडे आल्या होत्या. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी चेहऱ्यावर कापड लावून आपली ओळख लपवली. मात्र, अकोला पोलिसांनी त्यांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश नाकारला आणि ते पालकमंत्र्यांच्या परीक्षेत पास देखील झाले. मुख्य बातमीसाठी खालील लिंक ओपन करा : स्टिंग ऑपरेशन; चक्क मोटरसायकलवर स्वार होत अकोला शहराची बच्चू कडूंनी केली पाहणी https://www.etvbharat.com/marathi/maharashtra/state/akola/bacchu-kadu-surprise-visit-in-akola-city-on-motorcycle/mh20200514164428431