ABVP Agitation In Pune : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून राज्य शासनाच्या निषेधार्थ तिरडी यात्रा - अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तिरडी आंदोलन
पुणे - अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून महाराष्ट्र शासनाच्या निषेधार्थ पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तिरडी यात्रा आंदोलन ( Akhil Bharatiya Vidyarthi Parishad Agitation Pune ) करण्यात आले. यावेळी विद्यापीठ कायद्याच्या बदलामुळे महाराष्ट्रातील शिक्षणाची निर्घृण हत्या या महाविकास आघाडी सरकारच्या काळात होत आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी सरकारवर केला. महाराष्ट्र सरकारने विद्यापीठ कायद्यामध्ये बदल केल्यामुळे विद्यापीठाचे राजकीय अड्डा झाला आहे. त्यामुळे म्हाडा, आरोग्य भरती पेपर फुटी प्रकरणे घडली. सदर प्रकरणाने आणि महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेची हत्या केली आहे.