महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

ST Workers Strike :...तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार ! - पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्टँ

By

Published : Nov 8, 2021, 10:08 PM IST

पुणे - एसटी कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या आंदोलनाने आता आक्रमक स्वरूप धारण केले आहे. आज (सोमवारी) मध्यरात्रीपासून पुणे जिल्ह्यातील 13 डेपो हे बंद करण्यात आलेली आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने सुरू राहणार, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील 13 डेपो बंद करण्यात आलेली आहे. पुण्यातील शिवाजीनगर एसटी स्टँड येथे मोठ्या प्रमाणात प्रवासी वर्ग आलेला असताना अचानक आक्रमक स्वरूप धारण केलेल्या कर्मचारी आणि बंद करण्यात आलेल्या डेपोमुळे मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. पुण्यातील शिवाजीनगर बस स्थानक येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details