'बिनविरोध' ग्रामपंचायत : अनेक वर्षांचा संघर्ष बाजूला ठेऊन भाऊ आले एकत्र - कोल्हापूर पन्हाळा लेटेस्ट न्यूज
कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातलं उत्रे हे छोटंस गाव. गावात गेल्या अनेक वर्षांपासून प्रधान पाटील आणि विजयसिंह पाटील या दोघांचे आपापले गट आहेत. गावात इतरही काही महत्त्वाचे गट आहेत. मात्र भाऊ भाऊ असून सुद्धा विजयसिंह पाटील आणि प्रधान पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले आणि अनेकवर्षे या दोघांमधला संघर्ष गावकऱ्यांना पाहायला मिळाला. ग्रामपंचायत म्हटलं की वाद हा आलाच. मात्र, हे कुठेतरी थांबावं, असं गावातल्याच काही मंडळींना वाटलं आणि वैरी बनलेले दोन भाऊ एकत्र आले आणि ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली. पाहूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...