केंद्रीय मंत्री नारायण राणेंना अटक होऊ शकते पण... - कायदेतज्ज्ञ असीम सरोदे - नारायण राणे लेटेस्ट न्यूज
पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलिसांनी शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच, औरंगाबाद, रायगडमध्येही राणेंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर, नाशिक आणि पुण्याचे पोलिसांचे पथक राणेंना अटक करण्यासाठी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे राणेंच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे. यावर वकिल असीम सरोदे यांनी खास माहिती दिली आहे. 'केंद्रीय मंत्रीपदी असताना केलेले राणेंचे वक्तव्य गंभीर आहे. याप्रकरणी पोलीस त्यांना अटक करू शकतात. पण त्यापूर्वी राणेंना नोटीस द्यावे लागेल. अन्यथा नोटीशी शिवाय केलेली अटक चुकीची ठरेल', असे सरोदे यांनी म्हटले आहे. तर, 'केंद्रीय मंत्र्याने आपल्या कर्तव्याची जाण ठेवूण वक्तव्ये करणे गरजेचे आहे. जेव्हा एखाद्या मंत्र्याचे वक्तव्य मंत्रालयाच्या कामकाजाचा भाग म्हणून केलेले नसेल; त्याचे वक्तव्य जाहीर कार्यक्रमात वैयक्तीक पातळीवर असेल. तर पोलिसांना संबंधीत मंत्र्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत', असेही सरोदे यांनी म्हटले आहे.
Last Updated : Aug 24, 2021, 2:42 PM IST