'शिरच्छेदाची धमकी कुणी दिली हे पुनावालांनी सांगावे' पाहा नाना पटोलेंची संपूर्ण पत्रकार परिषद - कोव्हिशील्ड
मुंबई : अदर पुनावाला यांना धमकी कुणी दिली याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. शिरच्छेद करण्याची धमकी देणारे कोण हे पुनावाला यांनी सांगावे, त्यांना फोन करणारा कुणी लहान माणूस नाही असेही पटोले मुंबईत पत्रकारांशी बोलताना म्हणाले. अदर पुनावाला यांनी भारतात परत येणार असल्याचं म्हटलं आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो. आम्ही पुनावालांसोबत आहोत असेही पटोले म्हणाले. पुनावालांना केंद्राकडून सुरक्षा पुरविली होती, यामागचे राजकारण काय याचा खुलासा केंद्राने करावा असेही पटोले म्हणाले. याशिवाय देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला केंद्राचे नियोजनशून्य धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही पटोलेंनी केला आहे.