महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Shah Rukh Khan Video : लता दीदींच्या अंत्यदर्शनावेळी शाहरुख खानने मागितली दुआ आणि मारली फुंकर; पाहा नेमकं काय घडलं - Urmila Matondkar tweet

By

Published : Feb 7, 2022, 7:46 PM IST

मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल (रविवारी) निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यापूर्वी त्यांचे पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी काही काळ ठेवण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांनी देखील अंत्यदर्शन घेतले. यावेळी शाहरुखने लता दीदींच्या पार्थिवासमोर दुआ ( Shah Rukh Khan Dua ) मागितली आणि फुंकर मारली. यावर सोशल मीडियावर शाहरुखला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. यावर संजय राऊत, उर्मिला मातोंडकर ( Urmila Matondkar about shah rukh khan dua ) यांच्यासह अनेकांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details