ईटीव्ही भारत विशेष: 'सरकारी धोरणांमध्ये झाडं लावण्याची तरतुद, त्यांचे संवर्धन करण्याबाबत उदासीनता'
मराठमोळे अभिनेते सयाजी शिंदे यांनी सध्या वृक्ष संवर्धन आणि वृक्ष लागवडीसंदर्भात १२ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कामं हाती घेतली आहेत. झाडे लावणे, वाढवणे, त्यांचे संवर्धन करणे याचसोबत त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. वृक्ष बँक, वृक्ष सुंदरी पुरस्कार, निसर्गराजा पुरस्कार, सेल्फी विथ ट्री यांसारख्या उपक्रमांतून निसर्गाबद्दल जनजागृतीची मोहिम हाती घेतली आहे. सयाजी शिंदे यांचे उपक्रम, झाडांबद्दलची आत्मीयता आणि महामारीनंतर चित्रपटांचे बदलणारे स्वरुप याबद्दल जाणून घ्या 'ईटीव्ही भारत'च्या विशेष मुलाखतीतून...