राजकीय कार्यक्रमांना गर्दी चालते मग नाटकांनाच निर्बंध का? - भरत जाधव - पुन्हा सही रे सही नाटक
नाशिक - सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर नाट्यगृह सुरू झालेत. नाशिकच्या कालिदास कलामंदिरात तब्बल आठ महिन्यानंतर 'पुन्हा सही रे सही' या व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग झाला. यावेळी प्रेक्षकांनी नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसद दिल्याने नाटक हाऊसफुल्ल झाले. मात्र सरकारने नाटकासाठी 50 टक्के प्रेक्षकांची उपस्थिती ठेवल्याने अनेक अडचणी येत असल्याचे मत, अभिनेता भरत जाधव यांनी व्यक्त केले. राजकीय कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. मग संस्कृती जोपासणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करणाऱ्या नाटकांसाठी निर्बंध का? असा सवाल उपस्थित करत सरकारने नाटकाला प्रेक्षकांची 100 टक्के उपस्थिती ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे मत त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.