अमली पदार्थ प्रकरणी अभिनेता अर्जुन रामपाल चौकशीसाठी हजर - अभिनेता अर्जुन रामपाल अमली पदार्थ प्रकरण
मुंबई - अमली पदार्थ प्रकरण आणि बॉलिवूड कनेक्शन सध्या सर्वत्र गाजत आहे. अनेकांची या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. काल (गुरुवारी) अभिनेता अर्जुन रामपाल याच्या प्रेयसीची एनसीबीकडून सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. यानंतर आज (शुक्रवारी) अर्जुन रामपालदेखील चौकशीसाठी हजर झाला आहे. याबाबत ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी महेश बागल यांनी घेतलेला आढावा...