कोविड केअर सेंटरपेक्षा डेडिकेटेड कोविड सेंटरची जास्त गरज - डॉ. अमोल कोल्हे - अमोल कोल्हे डेडिकेटेड कोविड सेंटर मत
पुणे - शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पुण्यातील वाघोली येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली. त्याठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेऊन काही कमतरता आहे याची त्यांनी माहिती घेतली. कोविड केअर सेंटरपेक्षा DCHC म्हणजेच डेडिकेटेड कोविड सेंटरची जास्त गरज असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत असून या इंजेक्शनच्या वापराबाबत डॉक्टरांमध्ये जनजागृती झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.