VIDEO : अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीत विचित्र अपघात; घटनेचा थरार कॅमेरात कैद - अमरावती अपघात बातमी
अमरावती - अंजनगाव सुर्जी येथे एक विचित्र अपघात घडला आहे. यामध्ये डिव्हायडरवरून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या संत्राच्या ट्रॅक्टरवर विरुद्ध दिशेने येणारी दुचाकी आदळल्याने एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अंजनगावातील पेट्रोल पंप जवळ ही घटना घडली आहे. घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.