VIDEO : पुण्यात प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणी अभाविपचा आक्रोश मोर्चा - प्रलंबित शिष्यवृत्ती प्रकरणी अभाविपचा आंदोलन
पुणे - गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला आहे. यासाठी आज (मंगळवारी) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते समाज कल्याण कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. महाराष्ट्र राज्यातील 5 लाख 50 हजार विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे एकूण 6 हजार कोटी रुपये प्रलंबित ठेवले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले असून विद्यार्थ्यांना लवकरात लवकर त्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती मिळावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांनी केली.