'आता पुन्हा विकासाकडे लक्ष देण्याची गरज' - आदित्य ठाकरे न्यूज
मुंबई - दिल्लीतील निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाला निर्विवाद वर्चस्व मिळाले आहे. दिल्लीतील निकालांवर देशभरातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आदित्य ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करत, आता पुन्हा विकासाकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे, असे म्हटले. तर दिल्लीत झालेला भाजपचा पराभव हा तर फक्त ट्रेलर आहे पिक्चर तर अजून बाकी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.