VIDEO : झाडावर वीज कोसळून लागली आग; कोल्हापुरातल्या वाठारमधील घटना - वाठारगाव झाड आग व्हिडिओ
कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील वाठार गावामध्ये एका झाडावर वीज कोसळून आग लागल्याची घटना घडली. गावातील दत्त मंदिरासमोर हे झाड आहे. आग मोठी असल्याने अग्निशामक दलाला पाचारण करून ही आग आटोक्यात आणण्यात आली. रविवारी रात्री आठ वाजता जिल्ह्यात सर्वच भागात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह धुवांधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वीजा कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.