स्पेशल : 35 वर्षांपासून हाताने कृष्णमूर्ती घडवणारा कलाकार - दारव्हा मूर्तीकार न्यूज
यवतमाळ - दारव्हा येथील कलावंत संतोष ताजने हे गेल्या ३५ वर्षांपासून आपल्या हाताने मातीच्या सुबक मूर्ती घडवतात. जन्माष्टमी निमित्त संतोष ताजने यांनी तयार केलेल्या श्रीकृष्णाच्या मूर्ती कुतुहलाचा विषय बनल्या आहेत. या शिवाय कागदाच्या लगद्यापासून मूर्ती तयार करणे, वॉटर कलर पेंटिंग, रांगोळी आदी कलेत संतोष निपुण असून त्यांचा तेरा वर्षीय मुलगा ईश्वर हासुद्धा मूर्तीकलेच्या व्यवसायात मदत करतो. त्यांच्या या कलेचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.