चिखलीच्या पेठमध्ये लक्झरी बसची रिक्षाला धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद - चिखली लक्झरी बस आणि रिक्षा अपघात न्यूज
बुलडाणा - चिखली खामगाव मार्गावरील पेठ गावाजवळ भरधाव लक्सरी बसने एका रिक्षाला उडवल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. किशोर गजानन इंगळे, असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताचा हा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.