CCTV Video : देव तारी त्याला कोण मारी; चारचाकीच्या धडकेतून बचावले पती-पत्नी आणि लहान मुलगा - चारचाकी दुचाकी अपघात
औरंगाबाद-जालना रस्त्यावरील शेकटाजवळ वेगाने आलेल्या चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार ( Four-Wheeler Hits a Two-Wheeler in Aurangabad ) धडक दिल्याची घटना समोर आली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे या अपघाताची भीषणता दिसून येत. सुदैवाने गाडीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबियांचे प्राण बचावले आहेत. दुचाकीस्वार शेकटा येथून औरंगाबादकडे येत असताना त्याने वळण घेतलं. त्यावेळी औरंगाबादकडून जालनाकडे वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की दुचाकी 10 ते 15 फूट पुढे फरफटत गेली. तर त्यासोबत दुचाकीस्वार देखील ओढली गेला. गाडीवर असलेला लहान मुलगा आणि पत्नी ही जागेवरच खाली पडले. सुदैवाने मागून कोणतेही वाहन येत नसल्यामुळे या तिघांचेही प्राण बचावले आहे. याप्रकरणी अद्याप कुठलीही पोलीस तक्रार देण्यात आले नसल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितला आहे.
Last Updated : Dec 30, 2021, 3:05 PM IST