जागतिक छायाचित्र दिन : कोल्हापुरातील देवरुखकर पिता-पुत्राने केलाय 1200 हून अधिक जुन्या कॅमेरांचा संग्रह - देवरुखकर पितापुत्र
कोल्हापूर - आजचा दिवस जगभरात छायाचित्र दिन म्हणून साजरा केला जातो. याच जागतिक छायाचित्र दिवसानिमित्त आपण अशा कुटुंबाची भेट घेणार आहोत, ज्यांनी गेल्या 50 वर्षांपासून जुन्या आणि क्वचितच पाहायला मिळणाऱ्या कॅमेरांचा संग्रह केला आहे. एक दोन नाही तर तब्बल 1200 हुन अधिक कॅमेरांचा संग्रह त्यांनी केला आहे. संजीव देवरुखकर आणि सर्वेश देवरुखकर असे या पितापुत्रांचे नाव आहे. ज्यांनी हा अफलातून संग्रह केला आहे. यामध्ये 2 इंचाच्या कॅमेरापासून अगदी सुरुवातीच्या काळातील 7 ते 8 फूट लांबी असलेल्या मोठ मोठ्या कॅमेरांचाही संग्रह आहे. विशेष म्हणजे यातील बहुतांश कॅमेरे अजूनही सुस्थितीत असून अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी याचे जतन केले आहे. जागतिक छायाचित्र दिनानिमित्त याच देवरुखकर यांच्याशी बातचीत करून त्यांच्या या संग्रहाबद्दक ईटीव्ही भारतने अधिक माहिती जाणून घेतली आहे.
Last Updated : Aug 19, 2021, 11:24 PM IST