Chikhaldara Tourist Spot : अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने चिखलदरा पर्यटन स्थळाचा पारा घसरला - Chikhaldara tourist spot
अमरावती - अचानक आलेल्या थंडीच्या लाटेने विदर्भाचे नंदनवन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील पर्यटन स्थळाचा पारा कमालीचा घसरला आहे. चिखलदरा येथे 6.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अमरावती जिल्ह्याचे तापमान सात अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. गेल्या बारा वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक या थंडीने मोडीत काढलेला आहे. (Chikhaldara tourist spot) सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या चिखलदरा पर्यटन स्थळ पूर्णपणे थंडीने गारठला आहे. कुडकुडत्या थंडीचा बचाव करण्यासाठी नागरीक घराबाहेर निघताना गरम कपडे मोठ्या प्रमाणात वापरत आहेत. ही थंडी इतकी वाढत आहे की, दिवसाही शेकोट्या पेटवल्या जात आहेत.