मालखेड अंबादेवी उत्सव; नवरात्रीच्या अखंड ज्योत सप्ताहात 514 घटांची स्थापना - Navratri Special
अमरावती - मालखेड रेल्वे स्थानिक भानामती नदीच्या काठावर वसलेल्या मालखेड गावात निसर्गरम्य वातावरणात वास्तव्य असलेल्या अंबा मातेच्या आणि शिव मंदिरात भक्तांची नेहमीच गर्दी पाहायला मिळते. अंबा माता मालखेडवासीयांचे ग्रामदैवत म्हणूनही ओळखल्या जाते. भाविकासाठी हे श्रद्धेचे स्थान असून नवरात्रीच्या दरम्यान नऊ दिवस येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी मात्र 514 घटांची स्थापना केल्या गेली असून दरवर्षी हा आकडा वाढत जात आहे. दररोज सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या महाआरतीला शेकडो भक्तगणांची हजेरी सुद्धा असते.