नवी मुंबईतील कॅलिग्राफरने साकारले जय महाराष्ट्र नावाचे ५०० पोस्टर; ओएमजी वर्ड ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद - नवी मुंबई जय महाराष्ट्र कॅलिग्राफी ओएमजी वर्ड ऑफ रेकॉर्ड नोंद
नवी मुंबई - महाराष्ट्रातील कोरोना संकटाचे भान ठेवून यंदा १ मे २०२१ रोजी महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन राज्य शासनाने नागरिकांना केले होते. मागच्या वर्षीही कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यंदा राज्याच्या स्थापनेचा ६१वा वर्धापन दिन होता. यानिमित्त कामोठ्यातील श्रीराम महाजन या सुलेखनकारांनी(कॅलिग्राफर) घरातच पाचशे 'जय महाराष्ट्र' असे नाव लिहिलेली पोस्टर सकाळी दहा वाजल्यापासून बनविण्यास सुरुवात केली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी ही पोस्टर तयार केली. त्याची नोंद 'ओएमजी वर्ड ऑफ रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.