जमिनीच्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला - palghar crime news
विरार पूर्वेच्या मनवेल पाडा परिसरात जमिनीच्या वादातून ५० वर्षीय व्यक्तीवर तीन जणांनी भरदिवसा जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत पीडित अमित चौधरी याला तिघांनी लाथा बुक्के तसेच दगडाने जखमी करत मारहाण केली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून विरार पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पोलीस CCTV च्या माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहे.