'या' भागात जन्माला आलो, ते पाप केलं का?'; ४५ हजार मतदारांचा निवडणुकीवर बहिष्कार - हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदारसंघ
स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही या भागातील नागरिक सर्व सोईसुविधांपासून वंचित आहेत. 'या बंदी भागात जन्माला आलो, ते पाप केलं का?' असा प्रश्न येथील नागरिक उपस्थित करीत आहेत. त्यामुळे हिंगोली-उमरखेड लोकसभा मतदार संघातील ३५ गावातील ४५ हजार मतदारांनी येत्या १८ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्धार केला आहे.