पाणी हेच समृद्ध जीवन - water is everywhere
मध्य प्रदेश - मध्य प्रदेशातील झाबुआ हा असा भाग आहे, जिथे पाण्यासाठी लोक आपला जीव धोक्यात घालतात. मालवांचलमधील आदिवासी बहुल भागातील लोकांना बादलीभर पाण्यासाठी अनेक किलोमीटर प्रवास करावा लागत होता. अनेक वर्षांपासून पाण्याच्या भीषण समस्येने ग्रासलेल्या झाबुआतील लोकांसाठी एक आशेचा किरण म्हणून पुढे आले ते पद्मश्री महेश शर्मा. महेश शर्मा यांनी झाबुआ जिल्ह्यातील आदिवासींच्या जुन्या परंपरेतील हलमाच्या माध्यमातून जल संवर्धनाची मोहीम राबविली. हलमा हा भीली बोली भाषेतील शब्द आहे. याचा अर्थ सामूहिक श्रमदान असा आहे. त्यांनी आदिवासींच्या मदतीने झाबुआ जिल्ह्यातील सर्वात मोठा डोंगर असणाऱ्या हाथीपावावर कंटूर ट्रेचिंगचे काम सुरू केले. तिथे लहान मोठ्या 73 तलावांची निर्मिती केली. यामुळे झाबुआसह आसपासच्या जिल्ह्यातील नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लागले. शिवाय या उपक्रमामुळे भूजल पातळीतही वाढ झाली आहे.