शेंगदाणे विकणाऱ्या तरुणाची सातासमुद्रापार झेप - 3mp package
कोप्पल (कर्नाटक) - जीवनात आपण जेव्हा सर्वकाही गमावतो तेव्हा फक्त उरते ती आशा. या आशेच्या जोरावर अनेकांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे. आज आपण अशाच एका तरूणाची यशोगाथा पाहणार आहोत, की ज्यानं एकेकाळी गोव्याच्या समुद्रकिनारी शेंगदाणे विकले. मात्र आज तो त्याच सातासमुद्रपार असलेल्या ब्रिटीशांच्या आर्मीत काम करतोय. 25 वर्षापूर्वी कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील शाहपूर या गावात गोपालचा जन्म झाला. तीन बहिणी, एक भाऊ आणि आई-वडील अशा पाच जणांचे हे गरीब कुटुंबात गोपाल या सर्वांमध्ये लहान होता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यानं कामाच्या शोधात ते गोव्यामध्ये स्थलांतरित झाले. आणि छोट्या-मोठ्या कामांना सुरूवात केली. आणि तेथून त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. एका ब्रिटीश दांपत्याने त्याला दत्तक घेतले.